01
03
/
02
03
/
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर विषयी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही एक मराठी नाट्य संस्था आहे जी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करते.
११८ वर्षांची यशस्वी परंपरा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाटक व नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेली देशातील सर्वात मोठी संस्था आहे. इ.सन् 1905 ला स्थापन झालेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्र किंवा भारत देशच नव्हे तर जागतिक राहिले आहे. प्रतिवर्षी भव्य नाट्य संमेलन आयोजित करुन वर्षातून एकदा अधिकाधिक नाटकवाल्या मंडळींना एकत्रित केले जाते. नाट्यचळवळ वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही परिषदेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. शाखांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. सर्वच संमेलने ही शाखांच्या माध्यमातूनच मध्यवर्ती आयोजित करत असते. परिषदेच्या शाखा याच नाट्य चळवळीच्या मुख्य धमण्यांच कार्य करतात. अशाच शाखांपैकी एक शाखा म्हणजे लातूर महानगर शाखा.
लातूर महानगर शाखेची स्थापना 2015 साली तत्कालीन अध्यक्ष श्री मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाच्या मंजुरीने झाली. आज रोजी शाखेचे 325 सदस्य असून सदस्यत्वासाठी सातत्याने विचारणा होत असते. परंतु परिषदेच्या घटनेप्रमाणे केवळ रंगकर्मी व नाटकाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींनांच सदस्यत्व देण्यावरच शाखेचा भर आहे. सर्व सर्वसमावेशकपणे शाखा नाट्य वृद्धिसाठी लातूर व परिसरात सक्षमपणे कार्यरत आहे.
अध्यक्षांचे मनोगत
शाखा स्थापनेपासूनच अध्यक्ष होण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. हे मी माझं भाग्य समजतो. शाखा स्थापनेपासूनच शाखेने लातूर व परिसरातील नाट्य चळवळीला अधिकचे बळ देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न केले आहेत. सुरुवातीलाच लातूर मधील सर्व नाट्य संस्थांचे प्रमुख सदस्य सोबत घेऊन कार्यकारिणी केली गेली. जिच्या माध्यमातून दर वर्षी नाट्य कार्यशाळांचे आयोजन केले जाते. कोरोना काळात ऑनलाईन सिस्टीमचा वापर करुन भेदरलेल्या समजमनाला स्थीर करण्याच्या दृष्टीने शाखेने राज्य स्तरीय प्रेमपत्र स्पर्धेस आयोजन केले.
ज्यात राज्यभरातून 155 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शाखेने राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेऊन “मुक्ती” हे नाटक सोलापूर केंद्रावर सादर केले. ज्यात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले. तर केंद्रावरील सर्व वैयक्तिक प्रथम पारितोषिके पटकावत नाटक पहिले आले. ज्यात दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा – वेशभूषा ही प्रथम पारितोषिके तर स्त्री व पुरुष अभिनयांसाठीची रौप्य पदके मिळवली.
श्री.शैलेश प्रकाश गोजमगुंडे
अध्यक्ष